आपला जिल्हा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबीयांच्या डोक्यावर मायेचा हात…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली स्वर्गीय विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबीयांच्या डोक्यावर मायेचा हात…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली स्वर्गीय विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

बारामती वार्तापत्र 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असा धीर देत त्यांनी कुटुंबीयांना आधार दिला. या भावस्पर्शी भेटीमुळे परिसरात उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.
कर्तव्यपथावर असतानाही अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D