स्थानिक

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय अधिकार्‍याचे खाजगी कारनामे, पगार शासनाचा सेवा मात्र खाजगी क्लिनिकमध्ये!….

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय अधिकार्‍याचे खाजगी कारनामे, पगार शासनाचा सेवा मात्र खाजगी क्लिनिकमध्ये!….

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बारामती वार्तापत्र 

म्हणतात ना…पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे प्रशासनावर जबर पकड आहे. मात्र, बारामती येथील गोर-गरीब दु:खी पिडीतांसाठी नावाजलेले शासकीय महिला हॉस्पीटलमधील एक वैद्यकीय अधिकारी इंदापूरमध्ये स्वत:चे क्लिनिक चालवून शासनाची फसवणूक करीत असल्याचे नुकत्याच सोशल मिडीयावर शस्त्रक्रिया करतानाचे छायाचित्र व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असताना, बारामतीचे नाव वेगवेगळ्या पद्धतीने गाजत आहे. त्यामध्ये अशा वैद्यकीय अधिकार्‍याने त्यामध्ये भर घातल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री याबाबत कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हा वैद्यकीय अधिकारी इतर जिल्ह्यात जावून सुद्धा शस्त्रक्रिया करीत असल्याचे समोर आले आहे यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. कोरोना काळा याच वैद्यकीय अधिकार्‍यांना नागरीकांना देव मानले होते या देवाने चक्क शासनाला व पिडीत नागरीकांची फसवणूक करून स्वत:चा धंदा ऐटीत थाटलेला आहे.

या वैद्यकीय अधिकार्‍याचे काम म्हणजे सतत बाहेरगावी जाऊन खाजगी ठिकाणच्या शिबिरामध्ये भाग घेणे, रूग्ण आपल्याकडे आकर्षित करणे, त्या शिबीरात सल्ले देणे, वेळपडल्यास शस्त्रक्रिया करणे हे कारनामे सतत सुरू आहे.

इतर जिल्ह्यात शस्त्रक्रिया करीत असतानाचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेला उधान आले आहे.

पगार शासनाचा सेवा मात्र खाजगी क्लिनिकमध्ये म्हणजे शासनाची घोर फसवणूक करणार्‍यावर आरोग्य विभागाचे वरिष्ठ संचालक, उपसंचालक कारवाई करणार का? अशी चर्चा सुरू आहे.

यासंदर्भात बारामती वैद्यकीय रुग्णालयाचे शासकीय महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सदानंद काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील ही गंभीर बाब असल्याचे मान्य केले.

अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सरकारी वैद्यकीय अधिकार्‍याला बाहेरगावी जाऊन करता येत नाहीत असे सांगून संबंधित अधिकार्‍यावर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_