आपला जिल्हा

चार वर्षांपासून फरार असलेला मोका गुन्ह्यातील आरोपी बारामती तालुका पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना संशयित आरोपी आढळून आला

चार वर्षांपासून फरार असलेला मोका गुन्ह्यातील आरोपी बारामती तालुका पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना संशयित आरोपी आढळून आला

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोका गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे.

बारामती तालुका पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्यातील आरोपी सोनू उर्फ ओंकार संजय जाधव (रा. कळंब, ता. इंदापूर, जि. पुणे) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

सदर आरोपी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.

एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना संशयित आरोपी आढळून आला. त्याची खातरजमा करून त्याला ताब्यात घेण्यात आले व पुढील कायदेशीर कारवाईसाठी अटक करण्यात आली.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या पथकात ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार खारतोडे, एकसिंगे, आप्पा दराडे तसेच पोलीस शिपाई निलेश वाकळे आणि मनोज पवार यांनी सहभाग घेतला.

चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आल्याने बारामती तालुका पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D