माजी सभापती प्रवीण माने भाजपच्या वाटेवर ?
प्रवीण माने गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया नाही

माजी सभापती प्रवीण माने भाजपच्या वाटेवर ?
प्रवीण माने गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया नाही
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून पहिल्यांदाच उभे राहून आपली तालुक्यात अनोखी राजकीय क्रेज निर्माण करणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेत आगामी राजकीय खलबते केलेली आहेत. प्रवीण माने यांच्या रूपाने इंदापूर तालुक्यात भाजपला ताकदवान, युवक नेता मिळण्याची चित्रे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच, भारतीय जनता पार्टीत प्रवीण माने व त्यांचे समर्थक पक्षप्रवेश करणार, अशी चर्चा इंदापूर तालुक्यात रंगलेली आहे.
प्रवीण माने यांनी गुरुवारी (दि. १०) मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे, आपल्या सोशल मीडियावर फोटो टाकले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये असणारे माने यांचे समर्थक यांनी भाजप पक्षप्रवेश आधीच माने यांना शुभेच्छा सुरू केले आहेत. तसे पाहिले तर माने यांचे तालुकाभर नेटवर्क मोठे असल्याने व त्यांच्या पाठीशी सोनाई परिवार खंबीर असल्याने तालुक्यात येणारी प्रत्येक निवडणूक ते पक्ष वाढीसाठी ताकतीने कार्यकर्त्यांच्या जीवावर लढू शकतात. आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती व इतर निवडणुकांत भारतीय जनता पार्टीला इंदापूर तालुक्यामध्ये प्रवीण माने यांच्या रूपाने मोठी राजकीय ताकद मिळणार आहे. पुढील विधानसभा निवडणूक झाल्यापासून माने हे भाजपमध्ये जातील, अशी अटकळ तालुक्यामध्ये बांधली जात आहे; मात्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे असणारे भाजपचे स्नेहसंबंध यामुळे प्रवीण माने यांना भाजपमध्ये जाण्यासाठी ब्रेक लागत होता; मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीत स्पष्ट मत जाहीर केल्याने, माने यांना भाजप प्रवेश करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
प्रवीण माने गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया नाही
प्रवीण माने यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला तर इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच या पक्षाला येणार्या निवडणुकीमध्ये दमदार यश मिळेल असे बोलले जात आहेत. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे इतर खात्याचे मंत्री यांची भेट देखील प्रवीण माने यांनी घेतली होती. त्यामुळे इंदापूरच्या राजकारणात वेगळीच भर पडेल की काय? असे वाटत होते; मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान प्रवीण माने यांनी गाठल्यामुळे, बाकीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. असे असले तरी देखील प्रवीण माने यांच्या गटाकडून अधिकृत या संदर्भात काही माहिती समोर आली नाही.