स्थानिक

जुन्यांचा अनुभव, नव्यांची उमेद’बारामती पंचायत समितीच्या स्नेहमेळाव्यात विकासाचा घेतला आढावा

स्मृतिचिन्ह व रोप देऊन सत्कार करण्यात आला.

जुन्यांचा अनुभव, नव्यांची उमेद’बारामती पंचायत समितीच्या स्नेहमेळाव्यात विकासाचा घेतला आढावा

स्मृतिचिन्ह व रोप देऊन सत्कार करण्यात आला.

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या आजी-माजी पंचायत समिती सदस्यांचा सन्मान करण्यासाठी बारामती पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृतज्ञता स्नेहमेळाव्यात’ नव्या-जुन्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येत विकासाच्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात तालुक्याच्या विकासाचा प्रवास आणि लोकप्रतिनिधींच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिवंगत आजी-माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विविध काळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये काम केलेल्या सदस्यांचा स्मृतिचिन्ह व रोप देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अनेक माजी सदस्यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव मांडताना बारामतीच्या विकासातील निर्णय, राबविलेल्या योजना आणि बदलत्या ग्रामीण व्यवस्थेचा आढावा घेतला. “विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी अनुभव आणि नव्या नेतृत्वाचा समन्वय आवश्यक आहे,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

तालुक्यातील विविध भागांतील आजी-माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला स्नेहसंमेलनाचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी सदस्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत परस्परांशी संवाद साधला.

समारंभात संपतराव देवकाते, बाळासाहेब तावरे, सतीश खोमणे, संदीप बांदल, संभाजी होळकर, सचिन सातव, केशवराव जगताप, विश्वासराव देवकाते, विनायक गावडे, किशोर फडतरे, रंजनकुमार तावरे, के. टी. जाधव, माऊली कोले, भगतसिंह जगताप, मदनराव देवकाते यांच्यासह अनेक आजी-माजी सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती किरण तावरे यांनी केले. बाबा चोरमले यांनी स्वागत केले. गटविकास अधिकारी किशोर माने यांनी कार्यक्रमाचा आढावा मांडला. सूत्रसंचालन शरशांक मोहिते यांनी केले, तर उपसभापती शुभांगी आगवणे यांनी आभार मानले.

अनुभवातून विकासाला नवी दिशा’
बारामतीच्या विकासात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील आजी-माजी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. बदलत्या काळात नव्या नेतृत्वाला अनुभवी लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन मिळावे आणि विकासाचा वारसा अखंड राहावा, हा संदेश या कृतज्ञता स्नेहमेळाव्यातून देण्यात आला.

Back to top button