इंदापूर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्काराने पत्रकार राहुल ढवळे सन्मानित

पत्रकारीतेचा केला गुणगौरव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्काराने पत्रकार राहुल ढवळे सन्मानित

पत्रकारीतेचा केला गुणगौरव

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील निर्भीड पत्रकार म्हणून प्रचलित असलेले टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल ढवळे यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात इंदापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सदरील पुरस्कार राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे व पीपल रिपब्लिकन पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष संजय सोनवणे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

पत्रकार राहुल ढवळे यांनी तब्बल वीस वर्ष पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर,जेजुरी,करमाळा या तालुक्यांमध्ये त्यांनी अनेक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून निर्भीडपणे काम केले असून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या अनेक बातम्यांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असल्याचा इतिहास आजही सर्वश्रुत आहे.

ढवळे यांनी पत्रकारिता करत असताना नेहमीच सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी प्रमाणिकपणे पत्रकारिता जोपासली आणि वाढवली आहे.त्यांचे वडील अरुण ढवळे हे लेखक व कवी होते. वडिलांचा वारसा घेऊन ढवळे यांनी पत्रकारितेचे पुण्यामध्ये शिक्षण घेऊन आपल्या लेखणीतून नेहमीच अन्यायग्रस्त,शोषित, पीडितांना न्याय देण्याचे काम केले.ते नेहमीच नवख्या पत्रकारांना मार्गदर्शक ठरत असतात म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष संजय सोनवणे यांनी त्यांचा पुरस्कार देऊन गुणगौरव करत खऱ्या अर्थाने पत्रकारितेला सन्मानित केले आहे.

Related Articles

Back to top button