सोमेश्वर निवडणुकीत जमीन वादाचा नवा ट्विस्ट!
मृत व्यक्तीच्या नावाने कथित हक्कसोडपत्राचा आरोप; व्हिडीओ व्हायरल

सोमेश्वर निवडणुकीत जमीन वादाचा नवा ट्विस्ट!
मृत व्यक्तीच्या नावाने कथित हक्कसोडपत्र; व्हिडीओ व्हायरल
बारामती वार्तापत्र
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच निंबुत येथील जमीन व्यवहाराचा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. मृत व्यक्तीच्या नावाचा कथित वापर करून जमीन हक्कासंदर्भातील कागदपत्रे तयार करण्यात आल्याच्या आरोपांशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
२०२४ मध्ये या प्रकरणी शहाजी मुगुटराव काकडे आणि राजेंद्र मुगुटराव काकडे यांच्याविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याचे व्हिडिओ मध्ये स्पष्ट आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये जमीन व्यवहार, कथित कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेबाबत आरोप-प्रतिआरोप करण्यात येत असल्याचे दिसून येते. सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने जमीनविवादाला पुन्हा हवा मिळाली आहे.
कारखान्याची होणारी निवडणूक शेतकरी आणि त्यांच्या प्रपंच्या विषयी आहे. त्यामुळे कोणत्याही गटात शेतकरी सभासद मतदान करताना जमीन आणि शेतकरी यांच्या नातेसंधी प्रश्न चिन्ह उभे राहणार आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे.
प्रत्येक शेतकरी सभासद हा शेतजमीन, वारस नोंदी यांच्याविषयी फसवणूक चक्रातून जात असतो. त्यामुळे आगामी निवडणूक काळात यांना आत्मपरिसक्षण करण्यास भाग पाडणार विषय समोर आला आहे. या निवडणुकीत राजकीय पक्ष, प्रांत, तालुका नव्हे जिल्हा न पाहता आली प्रापंच्याची निवडणूक असल्याची घोषणा सर्वजण करत आहे.
या प्रकरणातून महसूल कार्यालयात शेतकऱ्यांची होणारी मुस्कटदाबी कोण रोखणार असा प्रश्न आता समोर आला आहे.






