स्थानिक

देऊळगाव रसाळ येथे महिलांची मका पिकाविषयक शेतीशाळा संपन्न

कृषि सहायक मीरा राणे यांनी यावेळी बीजप्रक्रीयेचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

देऊळगाव रसाळ येथे महिलांची मका पिकाविषयक शेतीशाळा संपन्न

कृषि सहायक मीरा राणे यांनी यावेळी बीजप्रक्रीयेचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत खरीप हंगाम 2021 च्या दृष्टीने राज्यभर विविध मोहिमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. देऊळगाव रसाळ येथे क्रॉपसॅप संलग्न मका या पिकाची महिलांची शेतीशाळा कोविड 19 च्या नियमांचे पालन करून राजेंद्र रसाळ, पोल्ट्री फार्म, रसाळ वस्ती येथे पार पडली.

या शेतीशाळेच्या माध्यमातून मका या पिकाच्या पूर्वमशागती पासून बियाणे निवड ते काढणी व काढणी पश्चात तंत्रज्ञान तसेच ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत विक्री व्यवस्था याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तंत्र अधिकारी सुप्रिया शिळीमकर यांनी शेतीशाळेची संकल्पना, बियाणे निवड, बीजप्रक्रीया व कृषि विभागाच्या विविध योजना या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत बाजरी या पिकाच्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांना मान्यवरांच्या हस्ते बियाण्याचे वितरण करण्यात आले. कृषि सहायक मीरा राणे यांनी यावेळी बीजप्रक्रीयेचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि सहायक सुप्रिया पवार यांनी केले. तसेच या शेतीशाळेचे आयोजन देऊळगाव रसाळच्या कृषि सहायक तृप्ती गुंड यांनी केले होते.

Related Articles

Back to top button