आपला जिल्हा

राजकारण नव्हे, समाजकार्य महत्त्वाचे ; माळवाडी गणातून सौ.जिजाताई रेडके यांची भूमिका

महिलांची वाढती जबाबदारी ओळखून ठोस काम करणार – जिजाताई रेडके

राजकारण नव्हे, समाजकार्य महत्त्वाचे ; माळवाडी गणातून सौ.जिजाताई रेडके यांची भूमिका

महिलांची वाढती जबाबदारी ओळखून ठोस काम करणार – जिजा रेडके

इंदापूर, आदित्य बोराटे –

प्रचारादरम्यान सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधताना समाजातील अनेक मूलभूत अडचणी समोर येत असल्याचे प्रतिपादन माळवाडी पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार सौ.जिजाताई रेडके यांनी केले. जनतेच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

“मी पहिल्यापासूनच महिला बचत गटांसोबत काम करत आहे. सुशिक्षित महिला जेव्हा समाजकार्याच्या प्रवाहात येते, तेव्हा तिला समाजाच्या खऱ्या गरजांची जाणीव असते,” असे सांगत त्यांनी महिला सक्षमीकरणाला आपल्या कार्याचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट केले. पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. “प्रत्येक अडचणीत जनतेने एक हाक द्यावी, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू हा माझा शब्द आहे,” असे त्यांनी म्हंटले.

आजच्या काळात महिलांनी घराबाहेर पडून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे किती महत्त्वाचे आहे, यावर भर देत सौ.जिजाताई रेडके म्हणाल्या की समाजाची मोठी जबाबदारी आता महिलांवर आहे. महिलांच्या रोजगार, स्वावलंबन, सुरक्षितता आणि सामाजिक सहभागासाठी ठोस पावले उचलली जातील, तसेच समाजातील लहान-मोठ्या प्रत्येक प्रश्नावर प्रामाणिकपणे काम केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्यामागील भूमिका स्पष्ट केली. सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे अपक्ष राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत, “आमच्या पाठीशी सर्वसामान्य जनता ठामपणे उभी आहे. त्यांच्या विश्वासावर आणि पाठिंब्यावर आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत,” असे त्या म्हणाल्या. निवडणुकांच्या काळात भुलथापा देऊन मते मागितली जातात आणि नंतर पाच वर्षे जनतेकडे दुर्लक्ष होते, अशी खंत व्यक्त करत त्यांनी जनतेला आवाहन केले की वास्तवाचा विचार करून सेवा करण्याची एक संधी द्यावी.

जनतेच्या विश्वासावर आधारित, सेवाभावी आणि विकासाभिमुख राजकारणाची दिशा दाखवणारा सौ.जिजाताई रेडके यांचा हा संदेश मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळवत आहे.

Back to top button