स्थानिक

बारामतीत रात्रीचा विद्युत पुरवठा खंडित; ‘ग्राहक त्रस्त, कर्मचारी मस्त’ म्हणत नागरिक संतप्त

“मी एकट्याने काही करू शकत नाही,”

बारामतीत रात्रीचा विद्युत पुरवठा खंडित; ‘ग्राहक त्रस्त, कर्मचारी मस्त’ म्हणत नागरिक संतप्त

“मी एकट्याने काही करू शकत नाही,”

बारामती वार्तापत्र 

शहरातील कोनवडी रोड परिसरातील अस्तरी-विश्वास नगर येथे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना तब्बल साडेचार तास अंधाराचा सामना करावा लागला. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी “ग्राहक त्रस्त, कर्मचारी मस्त” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी महावितरण (एमएसईबी) कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नाईट शिफ्टसाठी नियुक्त असलेले एक कर्मचारी ड्युटीवर नसून घरी असल्याचे समोर आले, तर उपस्थित असलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने “मी एकट्याने काही करू शकत नाही,” असे सांगितल्याचे नागरिकांनी सांगितले.

या निष्काळजीपणामुळे संपूर्ण विश्वास नगर परिसरात तब्बल साडेचार तास वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. उकाड्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची विशेष गैरसोय झाली. दरम्यान, नाईट ड्युटीसाठी सुरज तावरे हे कार्यालयात उपस्थित होते, तर एमआयडीसी परिसरातील दत्ता कृषी हे ऑन ड्युटी असूनही घरी असल्याचे समजले.

त्यामुळे तात्काळ दुरुस्तीचे काम होऊ शकले नाही, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. या संदर्भात वरिष्ठ अधिकारी पाटील यांच्याशी संपर्क साधल्यानंतर उशिरा रात्री विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

मात्र, या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Back to top button