बारामतीतील धक्कादायक घटना;घरगुती वादातून तरुणाची हत्या; सावत्र आई, वडील व भाऊ यांनीच केला खूनबारामतीतील धक्कादायक घटना;घरगुती वादातून तरुणाची हत्या; सावत्र आई, वडील व भाऊ यांनीच केला खून
शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना समोर आली

बारामतीतील धक्कादायक घटना;घरगुती वादातून तरुणाची हत्या; सावत्र आई, वडील व भाऊ यांनीच केला खून
शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना समोर आली
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील जोगवडी या गावातून आज धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. कुटुंबातील सावत्र आई, वडील व भाऊ यांनी संगनमताने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत त्यांच्या मेहुण्याने पोलिसात फिर्याद दिली आहे.
वडगाव- निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारे जोगवडी गावात शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना समोर आली. येथील सुरज संजय गुळमकर (वय- ३० वर्ष) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
प्रथम दर्शनी पोलीस सूत्रांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार शेतजमिनीच्या घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. रात्री उशिरा घटनास्थळी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड भेट देऊन माहिती घेतली. घटनेचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील हे करत आहेत.






