बारामतीतील सेटिंगबाज ग्रेड पोलिस अधिकारी झाले ‘वसुली’भाई?
उपविभागात पोलिस प्रशासनांचे कामकाज; कृषिमंत्री आणि जातीय नेत्यांच्या मर्जीनुसार काम

सेटिंगबाज ग्रेड पोलिस अधिकारी झाले ‘वसुली’भाई?
उपविभागात पोलिस प्रशासनांचे कामकाज; कृषिमंत्री आणि जातीय नेत्यांच्या मर्जीनुसार काम
बारामती वार्तापत्र
पोलिस प्रशासनाने अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या केल्या त्या सर्व नियमानुसार केल्या आहेत. बारामती उपविभागातील अनेक कर्मचारी, अधिकारी बदली होऊनही पुन्हा येथे काम करत आहे. ज्या ठिकाणी बदली झाली तिकडे जाणार नाही कारण,- कृषिमंत्री आणि जातीय नेत्यांच्या मर्जीनुसार काम मी येथे काम करून वरिष्ठ यांना वसूली करून देणार अशी चर्चा करताना एका सेटिंगबाज ग्रेड ग्रेड पोलीस उपनिरीक्षक म्हणाला आणि पोलिस आधीक्षकांचे पितळ उघडे पडले असल्याचे समोर आले आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मर्जीतील अनेक पोलिस कर्मचारी संलग्न असतात. ते वर्षानुवर्षे एका ठिकाणी त्याच टेबलवर किंवा त्याच पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे ‘वसुली’त पटाईत होतात. नेमकी हिच बब हेरून पोलिस अधीक्षक यांनी संलग्न असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आपापल्या तैनातीच्या ठिकाणी परतण्याचे आदेश काढण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यांना त्यांच्या बदली ठिकाणी कोण पाठविणार? राजकीय वैर कोण घेणार असे अनेक प्रश्न समोर आले आहे.
शहर पोलिस दलातील अनेक कर्मचारी ठाण्यात किंवा अन्य शाखेत संलग्न करण्यात येतात. जे कर्मचारी वरिष्ठांची मर्जी राखतात, वरिष्ठांसाठी वसुलीचे काम करतात असेच कर्मचारी ‘मलिदा’ असलेल्या ठिकाणी संलग्न करण्यात येतात. यामध्ये सर्वाधिक डिफाल्टेड कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या वर्षी बदली मध्ये याच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस मुख्यालयी अटॅच केलेले अनेक कर्मचारी सध्या स्थानिक गुन्हे शाखेत घेऊन पुन्हा वसूली जोरात सुरू केली आहे. साहेबांच्या मर्जीतील कर्मचारी म्हणून त्यांची ओळख निर्माण होते. त्याच गोष्टीचा फायदा घेऊन संलग्न कर्मचारी एकाच जागेवर राहून गब्बर होतात. मात्र यामध्ये कल्याण कोणाचे होते? त्रास कोणाला होतो. काम करणारे काम करतात आणि मोकाट वसूलीवाले वसूली करत आहे. याबाबत स्वतः ज्या अभिमानाने पुणे शहरात काम केले त्यांची प्रतिमेला डाग लागला आहे.
कर्तबगार पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भरणा क्राईम ब्रॅंचमध्ये केला जाते. परंतु, काही कर्मचारी ‘सेटिंग’ लावून स्थानिक गुन्हे शाखेत एंट्री मारली आहे. डिफॉल्टर म्हणून गुन्हे शाखेतून काढलेले कर्मचारी अधिकाऱ्यांना महागडे ‘गिफ्ट’ देतात. त्यामुळे त्यांच्यावर ‘दया’ केली जाते. वसुली करण्यासाठी काही पंटरसुध्दा गुन्हे शाखेत ठेवले जातात. नुकताच काही डिफॉल्टर कर्मचाऱ्यांनी गुन्हे शाखेत वसुली करण्यासाठी बदली करवून घेतल्याची चर्चा आहे. हाच प्रकार बारामती शहर आणि तालुका पोलिस स्टेशन येथे सुरू आहे.







