‘दृश्यम’ची आठवण करून देणारी घटना;पत्नीने केला नवऱ्याच्या हत्याचा प्रयत्न बारामती शहर पोलिस ठाण्यात सासऱ्याची गंभीर तक्रार
कोणतेतरी औषध देऊन अर्धवट बेशुद्ध करून बॅटने मारहाण केली.

‘दृश्यम’ची आठवण करून देणारी घटना;पत्नीने केला नवऱ्याच्या हत्याचा प्रयत्न बारामती शहर पोलिस ठाण्यात सासऱ्याची गंभीर तक्रार
कोणतेतरी औषध देऊन अर्धवट बेशुद्ध करून बॅटने मारहाण केली.
बारामती वार्तापत्र
शहरातील जामदार रोड परिसरात पत्नीने पतीला औषध देऊन अर्धवट बेशुद्ध केल्यानंतर मारहाण करून घरातील कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार सासऱ्याने बारामती शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी प्रकाश कान्होबा जगताप (वय ७१, रा. ढाकाळे, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश जगताप यांची सून शर्मिला प्रविण जगताप (वय ३८, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड, बारामती) हिच्याविरुद्ध बीएनएस अंतर्गत हत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० जुलै २०२६ रोजी रात्री ११.३० ते १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० या कालावधीत आरोपीने तिचा पती प्रविण प्रकाश जगताप (वय ४१) याला कोणतेतरी औषध देऊन अर्धवट बेशुद्ध करून बॅटने मारहाण केली.
बेशुद्ध अवस्थेतील प्रविण जगताप यांना घरातील हॉलच्या गॅलरीत बांधलेल्या चौकोनी कट्ट्यात झोपवून त्यावर कडप्पा फरशी लावून जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी ५ ऑगस्ट २०२६ रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगवले पुढील तपास करत आहेत.





