क्राईम रिपोर्ट

बारामतीसह चार परिसरात धुमाकूळ; दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

दोन दुचाकी, सोन्याचे दागिने असा ११.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

बारामतीसह चार परिसरात धुमाकूळ; दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

दोन दुचाकी, सोन्याचे दागिने असा ११.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

बारामती वार्तापत्र 

महिलांना रस्त्यात अडवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा वडगाव निंबाळकर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जबरी चोरीप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन मोटारसायकली व सोन्याचे दागिने असा सुमारे ११ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली. या तपासादरम्यान बारामती, फलटण, जेजुरी आणि लोणंद परिसरातील जबरी चोरीचे तब्बल १० गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी महिलांना रस्त्यात अडवून त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने लुटत असल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीचा आणखी कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे परिसरातील जबरी चोरीच्या घटनांचा तपास लागण्यास मोठी मदत झाली असून, वडगाव निंबाळकर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Back to top button