शैक्षणिक

बारामती तालुका शिक्षकेतर संघटनेला नवे नेतृत्व! विश्वासराव तांबे अध्यक्षपदी, सागर काकडे सचिवपदी बिनविरोध निवड

संघटनात्मक एकजुटीचा निर्धार नऊ सदस्यांची कार्यकारिणी निवड

बारामती तालुका शिक्षकेतर संघटनेला नवे नेतृत्व! विश्वासराव तांबे अध्यक्षपदी, सागर काकडे सचिवपदी बिनविरोध निवड

संघटनात्मक एकजुटीचा निर्धार नऊ सदस्यांची कार्यकारिणी निवड

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचा शिक्षकेतर मेळावा शारदानगर विद्यालय, शारदानगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना व बारामती तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यास तालुक्यातील लिपिक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यास महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विनोद गोरे, धुमाळ सर, बारामती तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, तसेच शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगरचे मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संघटनात्मक एकजूट, प्रलंबित प्रश्न आणि आगामी काळातील संघटनेची भूमिका याबाबत शिवाजीराव खांडेकर यांनी मार्गदर्शन केले.

मेळाव्यानंतर बारामती तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली. नऊ सदस्यांची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.

यामध्ये विश्वासराव तांबे यांची अध्यक्षपदी, तर सागर विलासराव काकडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली. संकेत सावंत यांची खजिनदारपदी, तर उमेश कारंडे, भाऊसाहेब लोंढे, चंद्रशेखर साळुंखे, राजाराम रसाळ, राजेंद्र ढमे आणि संजयराव वाबळे यांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

मेळाव्यासाठी शारदानगर विद्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. शिवाजीराव खांडेकर यांनी मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वासराव तांबे यांचे विशेष आभार मानले.

नवनिर्वाचित कार्यकारिणीचे उपस्थित मान्यवर व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Back to top button