आपला जिल्हा

आई’ विषयावर राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यस्पर्धा; १० नोव्हेंबरपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन

आम्ही भारताचे लोक’ चळवळीचा उपक्रम; विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, निवडक ५० कवितांचा काव्यसंग्रह होणार प्रकाशित..

‘आई’ विषयावर राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यस्पर्धा; १० नोव्हेंबरपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन

‘आम्ही भारताचे लोक’ चळवळीचा उपक्रम; विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, निवडक ५० कवितांचा काव्यसंग्रह होणार प्रकाशित..

इंदापूर –

आईच्या मायेचा, त्यागाचा आणि वात्सल्याचा भाव कवितेतून व्यक्त करण्यासाठी ‘आम्ही भारताचे लोक’ आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने स्मृतीशेष कमलबाई बळीराम सोनवणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘आई’ या विषयावर भव्य राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटांतील कवींना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, स्पर्धा पूर्णपणे विनामूल्य आहे. कविता पाठविण्याची अंतिम मुदत १० नोव्हेंबर २०२६ अशी आहे.

स्मृतीशेष कमलबाई बळीराम सोनवणे यांचा मृत्यूदिन १० नोव्हेंबर २०२१ असल्याने त्यांच्या स्मृती जपण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणारी कविता स्वतःची व स्वरचित असणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार केलेल्या कविता स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक निवडण्यात येणार आहेत. विजेत्यांना स्मृतीशेष कमलबाई सोनवणे यांचे चिरंजीव अंकुश बळीराम सोनवणे यांच्यातर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेतून निवडण्यात येणाऱ्या उत्कृष्ट ५० कवितांचा प्रतिनिधिक काव्यसंग्रह ‘आम्ही भारताचे लोक’ या प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात येणार आहे.

इच्छुक स्पर्धकांनी आपली कविता ऑनलाइन व्हॉट्सॲपद्वारे पाठविताना संदेशामध्ये ‘स्पर्धेसाठी’ असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत कविता पाठविता येणार आहेत.

या उपक्रमाचे आयोजन आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले असून, ही माहिती चळवळीचे मुख्य समन्वयक संदेश कर्डक यांनी दिली. अधिक माहिती व सहभागासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अविनाश मनवर (९६९९५००२७५), सुनंदा साखळे (९८२०२७६३१२), वैशाली ढेठे (७७०९९१२५९७) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच रिता रामटेके (७८४१८५६६३६), स्वाती चव्हाण (७०६६३७५००५), अंकुश सोनवणे (९५०३४४६९३८) आणि संघशिल भद्रे (९८८११२७००३) यांच्याशीही संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Back to top button