स्थानिक

बऱ्हाणपुर मधील व्यक्तीचे शोले स्टाइल आंदोलन

विविध मागण्यांसाठी टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन.बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायत

बऱ्हाणपुर मधील व्यक्तीचे शोले स्टाइल आंदोलन

विविध मागण्यांसाठी टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन.बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायत

बारामती वार्तापत्र

माजी सदस्य अनिल गवळी यांनी विविध मागण्यांसाठी व ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात बेमुदत आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.

आज सकाळपासूनच त्यांनी गावातील टॉवरवर जमिनीपासून 100 मीटर उंच चढून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केलीआहे.

बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अनिल भानुदास गवळी यांनी गावठाणातील अतिक्रमणे काढण्याबरोबरच घरकुल योजनेची शासनाची फसवणूक केल्याबाबत वारंवार ग्रामपंचायत व प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली.

मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर गवळी यांनी टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.गवळी यांनी मागील काही दिवसात वारंवार प्रशासनाकडे गावठाणातील अतिक्रमणे काढणे, ग्रामपंचायतीत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे, घरकुला संदर्भात शासनाची फसवणूक केल्याबाबत, शासकीय कामाचे फलक लावण्याबाबत, ग्रामसेवकाची बदली करणे, आधी मागण्यांसंदर्भात तक्रारी केल्या आहेत.

Back to top button