इंदापूरात सलग नवव्या वर्षी स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण सोहळा
राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत उत्साह; महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग
इंदापूरात सलग नवव्या वर्षी स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण सोहळा
राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत उत्साह; महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग
इंदापूर, –
राष्ट्र सेवा दल, महात्मा फुले सत्यशोधक प्रतिष्ठान, इंद्रैश्वर महिला विकास प्रतिष्ठान, महात्मा फुले ग्रुप दहीहंडी संघ तसेच अंगणवाडी क्रमांक ५७ व ५८ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा ध्वजारोहण समारंभ सावतामाळी नगर, नागझरी मळा येथील राष्ट्र सेवा दलाच्या शाखेच्या ठिकाणी सलग नवव्या वर्षी उत्साहात पार पडला. राष्ट्रभक्ती, सामाजिक एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना जोपासत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राष्ट्र सेवा दलाचे पुणे जिल्ह्याचे माजी फुलटायमर, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष तसेच सिनारमास कंपनीचे कामगार नेते अरुण होळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा केला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. तसेच अंगणवाडी क्रमांक ५७ व ५८ मधील बालक-बालिका, प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी नगरसेवक कैलास कदम यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमामागील उद्देश आणि उपक्रमाचे महत्त्व मांडले. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून सलग नवव्या वर्षी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. सूत्रसंचालन राष्ट्र सेवा दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे यांनी केले. माधवी सोननिस यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला नगरसेविका वंदना शिंदे, आरपीआयचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे, नगरसेवक अक्षय गानबोटे, भटक्या-विमुक्त संघटनेचे नेते तानाजी धोत्रे, अशोकराव पोळ, हनूमंत कांबळे, इसाक कोरबू, गणेश पाटील, कांबळे सर, इंदापूर तालुका कामगार बांधकाम कामगार कार्यालयाचे विकास खरात, कोमल कन्स्ट्रक्शनचे प्रशांत शिंदे, इंजोरा कंपनीचे राहुल ढवळे, पत्रकार नानासाहेब लोंढे, आदित्य बोराटे, ॲड. सिद्धार्थ मखरे, अस्लम बागवान, ह.भ.प. चौरे सर, पाटील साहेब, गफूर सय्यद, सुदेश गायकवाड, गणपत शिंदे, चांद पठाण, महेबुब मोमीन, प्रगतिशील शेतकरी भारत शिंदे, सोमनाथ पाचनकर, संदिप अभंग,सागर राऊत, आर्षद सय्यद, फोंडे मॅडम, शिंदे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून राष्ट्रभक्ती, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. सलग नवव्या वर्षीही नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडल्याने आयोजकांच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.






