स्थानिक

बारामतीतील रिक्षावाला आता पिक्चर मध्ये झळकणार !

दिग्दर्शकाने घेतली भेट

बारामतीतील रिक्षावाला आता पिक्चर मध्ये झळकणार !

दिग्दर्शकाने घेतली भेट

बारामती वार्तापत्र
संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर आपल्या कलेच्या रूपाने वेड लावणाऱ्या बारामतीतील रिक्षावाल्याला आता पिक्चर मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

बारामती येथे फावल्या वेळात सहकाऱ्यांना वाजले की बारा लावणी नृत्यावर नृत्य करीत त्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ व्हायरल झाला त्याला संपूर्ण राज्यातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली त्याची दखल घेत मराठी चित्रपट सृष्टीतील अलख निरंजन व एलिजाबेथ एकादशी या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक घनश्याम येडे यांनी बालाजी कांबळे यांना फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार आज ते बारामती येथे त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. बाबजी कांबळे यांनी ही भूमिका करण्याचे मान्य केले आहे त्यामुळे आता बारामतीतील लावणी सम्राट रिक्षावाला पिक्चर मध्ये झळकणार आहे.

Related Articles

Back to top button