आपला जिल्हा

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बावडा येथे मतदानाचा बजावला हक्क!

इंदापूर तालुक्यात सर्व 24 जागी विजयाचा व्यक्त केला विश्वास!

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बावडा येथे मतदानाचा बजावला हक्क!

-इंदापूर तालुक्यात सर्व 24 जागी विजयाचा व्यक्त केला विश्वास!

आदित्य बोराटे –

पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा (ता. इंदापूर) येथे शनिवारी सकाळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी व निरा भिमा कारखान्याचे अध्यक्षा भाग्यश्री पाटील, कन्या व बावडा लुमेवाडी जि. प. गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अंकिता पाटील ठाकरे, मुलगा राजवर्धन पाटील यांनीही मतदान केले.

उपमुख्यमंत्री स्व.अजितदादांच्या निधनामुळे दु:खद वातावरणामध्ये आपण सर्वजण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स्व.अजितदादांची विकासाची विचारधारा पुढे चालू ठेवणेसाठी इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व 24 उमेदवारांना जनता मोठ्या मताधिक्याने विजयी करेल तसेच भविष्याचा विचार करून पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन सत्ता मिळेल, असा असा ठाम विश्वासही मतदानानंतर बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मतदान केलेनंतर हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे, अशा सूचनाही हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या.

_________________________

Back to top button