आपला जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इंदापुरात रक्तदान शिबिराचे आयोजन 

रक्तदान शिबिरात 110 रक्तदात्यांनी रक्तदान केले

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इंदापुरात रक्तदान शिबिराचे आयोजन 

आदित्य बोराटे –

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून नवयुवक फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी (दि.19 ) फेब्रुवारी रोजी शहरातील पोरापोरांची चावडीजवळ भव्य रक्तदान शिबिर,लहान मुलांच्या तपासणी व डोळ्यांच्या तपासणीचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात 110 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे, पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे, उपनगराध्यक्ष शैलेश पवार, माजी नगराध्यक्ष पांडुरंग (तात्या) शिंदे,माजी नगराध्यक्ष सुरेश (बाबू) गवळी, नगरसेवक शकील सय्यद, शुभम पवार, सागर आरगडे, मा.नगरसेवक अमर गाडे,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत उंबरे, सुहास मखरे, गणेश भोंग,प्रवीण हरणावळ, प्रदीप रुपनवर आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील पोरा-पोरांची चावडी येथील नवयुवक फाउंडेशनच्या वतीने लहान मुलांच्या विविध तपासणी व डोळ्याच्या तपासणीसाठी डॉ.रविराज शिंदे,अभिजीत बर्गे,रेश्मा घोडके यांचे विशेष योगदान लाभले तसेच धीरज पाटील यांनी रक्त दात्यांचे रक्त संकलित केले.

यावेळी इंदापूर शहरातील विविध मान्यवरांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला, नवयुवक फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असल्याबद्दल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. नवयुवक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मोठे अथक परिश्रम घेवून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button