बारावीचा निकाल जाहीर; बारामती तालुका अव्वल; ८६८४ पैकी ३३६३ विद्यार्थी उत्तीर्ण, अनेक कनिष्ठ महाविद्यालयांचा विक्रमी यशदर
१९ महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.

बारावीचा निकाल जाहीर; बारामती तालुका अव्वल; ८६८४ पैकी ३३६३ विद्यार्थी उत्तीर्ण, अनेक कनिष्ठ महाविद्यालयांचा विक्रमी यशदर
१९ महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात सर्वाधिक निकाल बारामतीचा जाहीर झाला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडला मागे सारत यंदा बारामती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
बारामती तालुक्याचा निकाल ९६.३० टक्के जाहीर झाला आहे. तालुक्यातून ८६८४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ८३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शंभर नंबरी महाविद्यालय…
तालुक्यातील आर.एन.आगरवाल टेक्निकल हायस्कूल, न्यू ज्युनिअर कॉलेज वडगाव निंबाळकर, आनंद विद्यालय होळ, कृषी उद्योग शिक्षण संस्था, सदगुरु शिक्षण प्रसारक मंडळ, शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, धो.आ. सातव हायस्कूल, अभिवन इंटरनॅशनल स्कूल, एसीपीसीटीएस कनिष्ट महाविद्यालय, क्रिएटीव्ह इंटरनॅशनल स्कूल, समीर वर्ल्ड स्कूल, अनंत आशा इंग्लिश मिडीयम स्कूल, आदित्य इंटरनॅशनल स्कूल, बा.क.प इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूल, लडकत स्कूल ऑफ फाऊंडेशन, की एज्युकेशन बाल विकास मंदीर, टीसी महाविद्यालय व्होकेशनल या १९ महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे
• टीसी महाविद्यालय, बारामती. – ९१.६७
• मु. सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर- ८६.२१
• श्री. शहाजी कनिष्ठ महाविद्यालय, सुपे-९९.४१
• श्री. छत्रपती शाहू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बारामती- ८५.२२
• एमईएस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बारामती- ८२.६०,
• शारदाबाई पवार विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिवनगर- ९९.२८,
• श्री. मयुरेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, मोरगाव- ९१.८८,
• न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वाणेवाडी- ९०,
• नवमहाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय, पणदरे- ९५.०३,
• शारदाबाई पवार महाविद्यालय, शारदानगर- ९९.५१,
• कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी- ७५,
• विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती- ९५.३४,
• सोमेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सोमेश्वरनगर- ९९.४७,
• उत्कर्ष ज्युनिअर कॉलेज, वाघळवाडी- ९८.५५,
• श्रीमंत शंभूसिंह महाराज कनिष्ठ महाविद्यालय, माळेगाव- ४५.४५,
• एसव्हीएम अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, भिकोबानगर- ९४.६४,
• श्री. सिद्धेश्वर ज्युनिअर कॉलेज, को-हाळे बुद्रूक- ९९.६९,
• कै. जिजाबाई गावडे कनिष्ठ महाविद्यालय, पारवडी- ९५.६५,
• म.ए.सो चे उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती- ९७.८३,
• इंग्लिश मिडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, शारदानगर,
• अजितदादा इंग्लिश मिडियम स्कूल, संग्रामनगर- ९९.७०,
• एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज- ९१.१७,
• शारदाबाई पवार आयटीआय टेक्निकल सायन्स, शारदानगर- ३५.२९,
• मयुरेश्वर आयटीआय टेक्निकल सायन्स, खैरेवाडी- ६१.११,
• गर्व्हमेंट आयटीआय- ७३.४६,
• केयूएमएसएस प्रायव्हेट आयटीआय- 6६८.४२,
• मु. सा. काकडे महाविद्यालय (व्होकेशनल)- ८४.६१,
• राधेशाम आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट, बारामती (व्होकेशनल)- ८६.११,
• श्री. शहाजी कनिष्ठ महाविद्यालय, सुपे (व्होकेशनल)- ९७.६१,
• शारदाबाई पवार विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिवनगर(व्होकेशनल)- ९६.५५,
• न्यू इंग्लिश स्कूल, वाणेवाडी (व्होकेशनल)- ८३.३३.






