बारामतीत भाजप युवा मोर्चाचा संजय राऊतांविरोधात जोरदार निषेध; पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप
जयकुमार गोरे यांच्या समर्थनार्थ भाजप युवा मोर्चा आक्रमक

बारामतीत भाजप युवा मोर्चाचा संजय राऊतांविरोधात जोरदार निषेध; पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप
जयकुमार गोरे यांच्या समर्थनार्थ भाजप युवा मोर्चा आक्रमक
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांनी कथितरीत्या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बारामतीतील भिगवन चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवला. तसेच “संजय राऊतांचा निषेध असो”, “जयकुमार गोरे यांच्या समर्थनार्थ आम्ही ठाम आहोत” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनकर्त्यांनी जयकुमार गोरे यांच्याविरोधातील अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत, सार्वजनिक जीवनातील व्यक्तींविषयी बेताल वक्तव्य करणे अयोग्य असल्याचे सांगितले. अशा प्रकारची वक्तव्ये त्वरित थांबवावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनामुळे भिगवन चौक परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते. पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले.







