आपला जिल्हा

सोमेश्वर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी बजावला मतदानाचा हक्क!

पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू; सभासदांच्या कौलाकडे बारामती तालुक्याचे लक्ष

सोमेश्वर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी बजावला मतदानाचा हक्क!

पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू; सभासदांच्या कौलाकडे बारामती तालुक्याचे लक्ष

बारामती वार्तापत्र 

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कार्यक्षेत्रात राजकीय घडामोडींना वेग आला होता. प्रचारसभा, उमेदवारांच्या भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोप आणि सभासदांशी संवाद अशा विविध घडामोडींमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सभासदांच्या मतदानातून कोणाला कौल मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी मतदानाचा हक्क बजावत निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवला.

सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही केवळ संचालक मंडळ निवडण्यापुरती मर्यादित नसून, ऊस उत्पादक सभासदांचे हित, कारखान्याचे कामकाज आणि आगामी काळातील सहकारातील नेतृत्व अशा विविध मुद्द्यांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते.

आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी आणि निकालाकडे सभासदांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागणार आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासद कोणाच्या बाजूने कौल देतात, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

Back to top button